SR 24 NEWS

सामाजिक

हर हर महादेव…! तिसऱ्या श्रावणी सोमवारी ढोकेश्वरला भाविकांची मांदियाळी, महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक ढोकेश्वर चरणी… 

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तिसरा श्रावणी सोमवार असल्याने पुरातन पांडवकालीन लेणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री ढोकेश्वरला हजारो भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली. पहाटे तीन वाजता ढोकेश्वर मंदिरातील पिंडीला दही दुग्ध असा महाजलाभिषेक करून पुजा करुन महाआरती करण्यात आली. यानंतर डमरू व शंखनाद करत गोसावी कुटुंबाच्या वतीने विधिवत साज चढवला. पहाटेपासूनच भाविकांना दर्शनासाठी ढोकेश्वर मंदिर खुले करून देण्यात आले. 

त्यामुळे भाविकांनी ढोकेश्वर महाराज श्रींचे दर्शन घेऊन मंदिर प्रदक्षिणेचा मार्ग भाविकांनी हर हर महादेव, बम बम भोलेच्या घोषणांनी मंदिर परिसर दणाणून सोडला होता. टाकळी ढोकेश्वर (ढोकी) येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी हजारोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. त्यामुळे ढोकेश्वरला श्रावण महिन्यात विशेष महत्त्व असते. श्रावण महिना सुरू झाल्यापासून दररोज शेकडो भाविकांची श्री क्षेत्र ढोकेश्वर येथे गर्दी पाहायला मिळाली. ह्या तीन दिवसांमध्ये हजारो भाविकांनी पवित्र अशा पिंडीचे दर्शन घेतले.

या श्रावणमासात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पाऊसमान चांगला असल्याने यात्रेमध्ये विविध खेळणी, पाळणाघरे,खाऊची दुकाने, संसारोपयोगी वस्ती खरेदी करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तिसऱ्या श्रावणी सोमवार व त्यामध्ये रक्षाबंधन हा सण जोडून आल्यामुळे दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्तांनी तसेच पाहुणेरावळ्यांनी हजेरी लावली होती. यात्रेनिमित्त ढोकी ग्रामस्थांच्या वतीने जंगी हगामा भरविण्यात आला होता. कुस्त्यांच्या आखाड्याने श्री ढोकेश्वर महाराजांच्या यात्रेची सांगता झाली. 

 

 

चौकट:: तब्बल २१ क्विंटल साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद

 

श्री ढोकेश्वर यात्रेनिमित्त भाविकांसाठी टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांनी विशाल भंडाऱ्याच्या माध्यमातून २१ क्विंटल साबुदाणा खिचडी महाप्रसादाचे वाटपाचे आयोजन केले होते. श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त ढोकेश्वरचे दर्शन झाल्यानंतर अनेक भाविकांनी ढोकेश्वर खिचडी महाप्रसादाचा लाभ घेतला. ढोकेश्वरच्या साबुदाणा खिचडीचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. यादिवशीचा प्रसाद हा भाविकांसाठी पर्वणी आहे. दिवसभर हजारोंच्या संख्येने भाविकांनी पोटभर खिचडीचा प्रसाद देताना टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने उत्कृष्ट नियोजन व आयोजन पाहून अनेकांनी या ढोकेश्वर विशाल भांडारा कमेटीला धन्यवाद दिले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!