SR 24 NEWS

इतर

विद्यार्थ्याबरोबर आदर्श समाज निर्मितीत, गुरुजींचे योगदान प्रेरणादायी – आ.प्रवीण स्वामी

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी /चंद्रकांत हगलगुंडे  : देशाचा इतिहास घडवण्याचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने शिक्षकच करू शकतो असे सांगून विद्यार्थ्यांच्या हितासह समाज व राष्ट्रनिर्मितीत शिक्षकांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी असल्याचे स्पष्ट मत उमरगा -लोहारा तालुक्याचे आ. प्रवीण स्वामी यांनी व्यक्त केले.तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक सुरेश भोळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषद शाळा, ग्रामस्थ व भोळे परिवाराने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात आ.स्वामी बोलत होते. अध्यक्षस्थानी अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे हे होते.प्रारंभी सरस्वती चे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक सुरेश भोळे यांचा शाल, फेटा पुष्पहार घालून आ.प्रवीण स्वामी, सरपंच रामचंद्र आलूरे, सरपंच छायाताई लोहार, मुख्याध्यापक धुळप्पा शिदोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना आ.स्वामी म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेसाठी भोळे गुरुजींचे तन-मन -धनाने केलेले योगदान व कार्य निश्चितच प्रेरणावह असून प्रत्येक शिक्षकांनी शाळेसाठी सहकार्य केल्यास जिल्हा परिषद शाळा नावारूपास येऊन चांगले विद्यार्थी निर्माण होतील व गावच्या नाव लौकिकात भर पडेल असा विश्वास व्यक्त केला.सत्काराला उत्तर देताना सुरेश भोळे गुरुजी म्हणाले की, 37 वर्षाच्या कारकिर्दीत ज्ञानदान करताना ज्येष्ठ व श्रेष्ठांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबवून प्रोत्साहित करण्याचे काम केल्याने खऱ्या अर्थाने समाधान मिळाल्याचे सांगितले. सेवानिवृत्तीनंतरही गावच्या शाळेसाठी आर्थिक व सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली . यावेळी रामचंद्र आलूरे, डी.डी कदम, राजेंद्र लोहार, प्रशांत मिटकर, अशोक जाधव, राजेंद्र हिंगमिरे, शिवानंद लंगडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी नीलकंठ् इटकर, गुरुनाथ हांडगे, तुकाराम भोळे, राम लंगडे, बळीराम जेटे, अशोक मुळे, गणेश खोत, अमोल हांडगे, रामेश्वर हिप्परगे, संजय हांडगे सह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन बळीराम जेटे तर आभार मुख्याध्यापक धूळप्पा शिदोरे यांनी मांनले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!