तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तालुक्यातील अणदूर या ग्रामपंचायतीच्या खेडयातून सुरु झालेला जिल्हा युवक महोत्सवाचा प्रवास छत्रपती संभाजीनगर या महापालिकेच्या शहरात केंद्रीय युवक महोत्सवाच्या समारोप करण्यात आला .चारही जिल्हयात उत्कृष्ट आयोजन करण्या-या संयोजक जवाहर महाविद्यायांचा गौरव अतिथींच्या हस्ते करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या समारोपप्रसंगी चार ही जिल्हयातील संयोजक महाविद्यार्थ्यांच्या मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी व अभिनेते वैभव मांगले यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर, उप प्राचार्य डॉ. रवी पाटील, सांस्कृतिक प्रतिनिधी डॉ.गणेश मोहिते, डॉ.माणिक भताने यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मिलिंद पंडित, डॉ.विनोद जाधव, र.ब.अट्टल महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रजनी शिखरे, डॉ.समाधान इंगळे, डॉ .अरुण जाधव, डॉ. वृषाली गव्हाणे, डॉ.सतीश जाधव, तसेच जवाहर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चंनशेट्टी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.अंकुश कदम व डॉ.अनिता मुदकन्ना यांचा युवक महोत्सवाच्या समारोपप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.
या सर्व महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य व संयोजना सहभागी घेतलेल्या सर्वांबद्दल डॉ.कैलास आंभुरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मराठवाड्यात यंदा पावसाने कहर केला असताना नेमकं याच काळात आलेल्या चार जिल्हा व एका केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात यशस्वीरित्या करण्यात आले.
या अतिवृष्टीमुळे नद्या, नाले , रस्ते तुडुंब भरलेले अगदी पिकही पाण्यात गेलेली असताना युवा कलावंतांच्या उत्साहाला मात्र साक्षात वरून राजाही बांध घालू शकला नाही. तब्बल तेरा वर्षानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदापासून जिल्हानिहाय घेण्याचे ठरले. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. गणेश उत्सवानंतर ८ ते २९ सप्टेंबर या काळात महोत्सवाचे आयोजन करण्यात होते.
केंद्रीय युवक महोत्सवात उत्कृष्ट संयोजनाबद्दल, अणदूरच्या जवाहर महाविद्यालयाचा सन्मान !

0Share
Leave a reply












