SR 24 NEWS

इतर

ओला दुष्काळ जाहीर करून, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत द्यावी !, समाजवादीचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांचे तहसीलदारांना निवेदन

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : धाराशिव जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खरीप पिक जमीन दोस्त झाले असून , शेतातील माती खरडून गेली आहे, शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे. राज्य शासनाने या गंभीर प्रश्नाकडे निव्वळ पाहणी दौरे करून शेतकऱ्यांच्या दुःखावर मिठ पुसण्याचे काम न करता तातडीने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पन्नास हजाराची मदत देण्याचे मागणीचे निवेदन समाजवादी पक्षाचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांच्या शिष्टमंडळाने सोमवार दि.29 सप्टेंबर रोजी तहसीलदारांना देण्यात आले.

अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा, संपूर्ण वीज बिल माफ करावे, पिक विमा नुकसान भरपाई द्यावी व जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा गंभीर इशारा सरकारला देण्यात आला आहे. चाळीस वर्षात कधी नव्हे एवढे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून रब्बी बाबत ही शेतकऱ्याचा चिंता असून या संकटातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्याप्रती पूर्ण पाठबळ देण्याची गरज आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन बळीराजाला दिलासा देण्याची मागणी ही करण्यात आली आहे.

यावेळी समाजवादी पक्षाचे नेते देवानंद भाऊ रोचकरी, समाजवादी पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा देवानंद रुचकरी, लिंगय्या स्वामी,दिलीप लोमटे, महावीर मुळे, नवनाथ कारभारी, सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!