चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी / रोशन खानकुरे : महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या आदेशानुसार “महसूल सप्ताह 2025” अंतर्गत नागभीड तालुक्यात दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी पाच मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व भूमी साक्षरता अभियान राबविण्यात आले.या अभियानाचे आयोजन नागभीड, मेंढा किरमीटी, गिरगाव, तळोधी (बा.) आणि मिंडाळा या पाच मंडळांमध्ये करण्यात आले. यामध्ये सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थी यांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा – जसे की रहिवासी, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना यांचे प्रमाणपत्र व लाभ देण्यात आले.
अभियान दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. तसेच, भूमी साक्षरता अभियानांतर्गत जमिनीशी संबंधित माहिती, कायदे व प्रक्रिया यांचे प्रबोधन करण्यात आले.या उपक्रमात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सेवक, तसेच लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शन माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी व तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केले.
नागभीड तालुक्यात महसूल सप्ताह अंतर्गत पाच मंडळांमध्ये शिवराजस्व व भूमी साक्षरता अभियानाचे आयोजन

0Share
Leave a reply












