SR 24 NEWS

राजकीय

मतदारसंघ पुनर्रचनेच्या वावड्यांना आ.कर्डिले यांच चोख प्रत्युत्तर; “मी राहुरीतूनच निवडणूक लढवणार”

Spread the love

( राहुरी प्रतिनिधी ) २० सप्टेंबर :- राहुरी मतदार संघाची पुनर्रचना होणार असल्याने कर्डिले राहुरी मतदार संघाकडे लक्ष देत नाही यासह अनेक वावड्या माझ्या आजारपणात विरोधकांनी उठविल्या मतदारसंघ बदलला तरी मी राहुरीतूनच उभा राहणार असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काम करणारा नाही तर विकासाचे काम करणारा माणूस आहे असल्याचे प्रतिपादन आ.शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहयोगाने व आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत राहुरी नगरपरिषद हद्दीतील शुक्लेश्वर चौक ते कानिफनाथ चौक या काँक्रिटीकरण तसेच एस आर हॉटेल, नवी पेठ येथील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स, नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर चौक, संत महिपती महाराज चौक ते भुसारी घरापर्यंत या परिसरातील डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला.प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील , सार्वजनिक बांधकाम उपअभियंता जे.यु.सय्यद आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शिवाजीराव कर्डिले म्हणाले, की सत्तेत आपले सरकार आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून राहुरी मतदार संघात विकास करण्याचे काम यापुढील काळात होत राहील.

राहुरी शहरातील शुक्लेश्वर मंदिरासाठी स्लॅपचा सभामंडप देण्याची  आ. कर्डिले यांची ग्वाही

 प्रास्ताविक माजी विरोधी पक्षनेते दादा पाटील सोनवणे यांनी केले.तर विक्रम तांबे,प्रकाश पारक, अण्णासाहेब शेटे,सतीश फुलसौंदर,माजी नगरसेवक आर.आर तनपुरे,माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे,भाजपचे मंडल अध्यक्ष धनंजय आढाव,विक्रम भुजाडी,युवराज गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिरसाठ, शिवाजीराव डौले,कांतीलाल जगधने, उमेश शेळके, अजित डावखर आदी उपस्थित होते.

 शहरातील रस्त्या बाबत नाथ प्रतिष्ठानने दोन दिवसापूर्वी अनोखे आंदोलन करत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते.तसेच राहुरी भाजपा पदाधिकारी यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेवून रस्ते कामांसाठी निधीची मागणी केली.त्यानुसार नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर करत आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार कर्डिले व नाथ प्रतिष्ठानचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!