उमरगा (धाराशिव) प्रतिनिधी : पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा केसरजवळगा येथे दिनांक १९ सप्टेंबर रोजी शाळेतून बदलून गेलेल्या सहा शिक्षकांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमात चव्हाण सर, गवंडी सर, काळे सर, गुरनाळे सर, जवळेकर सर तसेच क्षीरसागर मॅडम यांचा शाल, श्रीफळ, फेटा व पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजिज शेख,सरपंच श्रीमती पूजा पटवारी, उपसरपंच जयपालसिंग राजपूत,माजी सैनिक बलभीम जाधव, माजी सरपंच अमोल पटवारी,गैबुशा मकानदार ,तंटामुक्ती अध्यक्ष शिवशंकर कणमुसे, उपाध्यक्ष बिरबलसिंग राजपूत, मान्यवर बालाजी डिगोळे व इंद्रजीत लोखंडे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच गावातील पालक, अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील सहशिक्षक बालाजी भोसले सर, सुनील राठोड सर, संजय भोसले सर, तसेच युवा प्रशिक्षणार्थी वैभव पाटील यांनी योगदान दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी भोसले सर यांनी उत्तमरीत्या केले, तर आभार प्रदर्शन सुनील राठोड सर यांनी मानले. बदलून गेलेल्या शिक्षकांना निरोप देताना शाळा परिवार व गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. त्यांच्या कार्याचा गौरव करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Leave a reply













