नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : समाजसेवा व देशभक्तीच्या भावनेचा सन्मान करत “युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिल” या सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने श्री देवीदास नागोराव सूर्यवंशी (अन्नाभाऊ साठे नगर, ता. नायगाव, जि. नांदेड) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. तरुण बांकोलिया यांनी नियुक्तीपत्र दिले. मानवाधिकारांचे रक्षण, भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध लढा, तसेच जनतेच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्याची जबाबदारी या पदावरून श्री. सूर्यवंशी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
संगठनाचे धोरण स्पष्ट करताना, शासन व पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने गुन्हे व भ्रष्टाचारमुक्त भारत घडविण्याचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. श्री. सूर्यवंशी यांच्या नियुक्तीमुळे नांदेड जिल्ह्यातील मानवाधिकार जनजागृती व समाजहिताच्या उपक्रमांना गती मिळेल, असा विश्वास संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
देवीदास सूर्यवंशी यांची “युनिव्हर्सल ह्युमन राईट्स कौन्सिल”च्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0Share
Leave a reply












