SR 24 NEWS

इतर

कै. दादाराम केशव तमनर (पाटील) यांचे वृद्धापकाळाने निधन; तमनर आखाडा गावात शोककळा

Spread the love

तमनर आखाडा (प्रतिनिधी) :  तमनर आखाडा येथील ज्येष्ठ नागरिक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व कै. दादाराम केशव तमनर (पाटील) यांचे दिनांक ३० जुलै २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने तमनर आखाडा गावासह पंचक्रोशीतील वातावरणात शोककळा पसरली आहे.

कै. दादाराम तमनर हे वारकरी संप्रदायाशी निष्ठेने जोडलेले होते. त्यांचा साधा आणि सोज्वळ स्वभाव, माणुसकीशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यामुळे ते सर्वांच्याच लाडक्या आणि आदरणीय व्यक्ती ठरले होते. सर्वसामान्य कुटुंबातून येऊनही त्यांनी सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या अत्यंत जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडल्या.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, दोन मुले, दोन सुना, दोन मुली, नातवंडे, नातसूना, पणतू असा मोठा परिवार आहे. ते वारकरी व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संताराम तमनर व तुळशीराम तमनर यांचे वडील तर  पांडुरंग केशव तमनर व भाऊसाहेब केशव तमनर यांचे  बंधू होते.

गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावातील तसेच परिसरातील अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या साधेपणाची, सेवाभावाची आणि माणुसकीची आठवण ग्रामस्थांच्या हृदयात सदैव अढळ राहील, अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!