राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांबू प्रकल्प व महादेव टेकडी शिवारात रविवारी सायंकाळी बिबट्याचा वावर आढळल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आज (रविवार 27 जुलै) रोजीसायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास नितीन बरे हे आपल्या घरी जात असताना, रस्त्याच्या कडेला त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत आपल्या वाहनातून मोबाईलमध्ये बिबट्याचे दृश्य शूट करून गावकऱ्यांपर्यंत पोहचवलं व खबरदारी घेण्याचे आवाहन केलं.
ही माहिती समजताच परिसरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांबू प्रकल्प परिसरात तसेच महादेव टेकडी शिवारात झाडी व जंगल भाग असल्याने वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र, बिबट्यासारख्या मोठ्या शिकारी प्राण्याचा वावर हा ग्रामस्थांसाठी धोकादायक असून वनविभागाने याची तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
वरवंडी येथे राहुरी कृषी विद्यापीठाच्या बांबू प्रकल्प परिसरात बिबट्याचा वावर, भर रस्त्यात आढळला नागरिकांना बिबट्या

0Share
Leave a reply












