विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, ढोकी, तिखोल,काकणेवाडी, भोंद्रे, परिसरातील ग्रामस्थांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार निलेश लंके प्रतिष्ठान, पारनेर तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्या पुढाकारातून रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी विशेष सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळी ढोकेश्वर येथे सकाळी ९:०० वाजता होणाऱ्या या कॅम्पचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते दिपक अण्णा लंके यांच्या हस्ते होणार आहे.या कॅम्पमध्ये ग्रामस्थांना विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये नवीन रेशनिंग कार्ड, रेशन कार्डवरील नाव कमी करणे किंवा दुरुस्त करणे, रेशन कार्ड ऑनलाइन करणे, बांधकाम कामगार कार्ड, आधार कार्ड अपडेट, आभा कार्ड काढणे तसेच रहिवासी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र यासारखे विविध दाखले मिळणार आहेत.
सर्वसामान्य जनतेला वेळ आणि पैसा वाचवून, एकाच ठिकाणी या सेवा मिळाव्यात, हा या कॅम्पचा मुख्य उद्देश आहे.निलेश लंके प्रतिष्ठानने नेहमीच सामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले असून, आपली सेवा, आपल्याच दारी या ब्रीद वाक्यानुसार हा उपक्रम राबवला जात आहे. ग्रामस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह कॅम्पला उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कॅम्प यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी (संपर्क: ९६८९०१२१२१) यांच्यासह संपूर्ण टीम कार्यरत आहे.हा कॅम्प ग्रामस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, गावातील प्रत्येक नागरिकाने याचा लाभ घेऊन आपली प्रशासकीय कामे सोयीस्करपणे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. निलेश लंके प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे गावकऱ्यांकडून स्वागत होत आहे.
टाकळी ढोकेश्वर येथे रविवारी लंके प्रतिष्ठानतर्फे रेशन कार्ड कॅम्पचे आयोजन, तालुकाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांचा उपक्रम

0Share
Leave a reply













