राहुरी विद्यापीठ, / आर. आर. जाधव (दि. 24 जुलै,) : आंतरराष्ट्रीय पातळीवर बुध्दीबळ स्पर्धेत आपला देश अजिंक्य ठरत आहे. आपल्या देशाचे बुध्दीबळ स्पर्धक विश्वनाथ आनंद, अजिंक्य कुंठे, डी. गुकेश यांनी बुध्दीबळामध्ये देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे. बुध्दीबळामुळे विद्यार्थ्यांच्या बुध्दीला चालना मिळते, एकाग्रता व संयम वाढते यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. बुध्दीबळ क्रीडा प्रकार आपल्याला जीवनातील आव्हानांना संधीत रुपांतरीत करायला शिकवते असे प्रतिपादन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये आंतरमहाविद्यालयीन बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. रविंद्र बनसोड बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र बुध्दीबळ संघटनेचे सहसचिव श्री. राजेंद्र कोंडे उपस्थित होते.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे नियंत्रक श्री. सदाशीव पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भणगे, कृषि यंत्रे व शक्ती अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र गडगे, अक्षय उर्जा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बाराई, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, विद्यापीठ क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी, सहाय्यक कुलसचिव वैभव बारटक्के, अहिल्यानगर बुध्दीबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट व लेफ. डॉ. सुनील फुलसावंगे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना राजेंद्र कोंडे म्हणाले बुध्दीबळ स्पर्धेची निर्मिती आपल्या देशात झालेली आहे. या खेळामध्ये रशिया व अमेरिकेचे वचर्स्व होते. आता बुध्दीबळ स्पर्धेत जगात आपले वचर्स्व आहे. आज फिडे विश्वचषक स्पर्धेत भारताची 19 वर्ष दिव्या देशमुखने बुध्दीबळ स्पर्धेत अंतिम फेरित धडक मारली आहे. या अनुषंगाने आज अंतरमहाविद्यालय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन कैतुकास्पद आहे.
या क्रीडा प्रकारामुळे आकलन क्षमता वाढते म्हणुन हा क्रीडा प्रकार शैक्षणीकदृष्ट्या महत्वाचा आहे. या खेळामुळे बौध्दीक मल्ल तयार होतात. महाराष्ट्र बुध्दीबळ संघटना या खेळाला सदैव्य प्रोत्साहन देत आहे व देत राहिल. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन नलावडे यांनी केले. या क्रीडा स्पर्धेमध्ये 29 कृषि महाविद्यालयांचे 29 संघ यामध्ये 133 मुले व 65 मुली सहभागी झाले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील फुलसावंगे यांनी केले तर आभार डॉ. डॉ. विक्रम कड यांनी मानले.
Leave a reply













