SR 24 NEWS

क्राईम

अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेला आरोपी ताहाराबाद यात्रेत आढळला, आरोपीस ताब्यात घेत राहुरी पोलिसांनी केले चिकलठाणा पोलिसांकडे सुपूर्त

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : ताहाराबाद येथील यात्रेत हद्दपार असलेला युवक अविनाश भिकन विधाते (वय २६, रा. ताहाराबाद) हा उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेच्या सतर्कता दिसून आली आहे.उपविभागीय दंडाधिकारी, श्रीरामपूर यांच्या आदेशानुसार आरोपी अविनाश विधाते याला दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ पासून पुढील एक वर्षाकरिता संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा, तसेच शिरूर (जि. पुणे), येवला (जि. नाशिक), वैजापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) या परिसरातून हद्दपार करण्यात आले होते.

मात्र, आरोपी ताहाराबाद येथील यात्रेत सहभागी होणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित पोलिस पथकाला सतर्क केले. पथकाने तातडीने शोधमोहीम राबवत आरोपीला दिनांक २४ जुलै २०२५ रोजी ताहाराबाद यात्रेत उपस्थित असल्याचे आढळून त्याला ताब्यात घेतले.

या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई म्हणून आरोपीस चिकलठाणा पोलीस स्टेशन (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे नेण्यात आले असून, त्याच्यावर हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाई करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!