प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेळकोणी खुर्द येथे ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत गावकऱ्यांनी एकत्र येत शाळेस आवश्यक साहित्याची अमूल्य भेट देत सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले आहे.शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (शालेय पोषण आहार) अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी करणे, शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि शाळाबाह्य गळती रोखणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेचा लाभ शाळेत नियमितपणे दिला जात असला तरी विद्यार्थ्यांसाठी जेवणाची ताटे व स्वयंपाकासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या.
ही समस्या लक्षात घेऊन गावातील विश्वनाथ अडबलवार, दत्तात्रय कुलकर्णी, सुजित डोंगरे, सचिन अनमुलवाड, राजेंद्र गरकेवाड, शंकरराव रेड्डी, गणपत वाघमारे, प्रल्हाद कापावार, किशन मळेकरी, शंकर बाळके, राजेंद्र कापावार, प्रल्हाद बासरे, सज्जन बाळापुरे, दत्ता यारावाड, काशिनाथ रेड्डी, राजू शिळेकर, रामकिशन यरकलवाड, संदीप बाळके व ज्ञानेश्वर यरकलवाड यांनी पुढाकार घेत ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत शाळेस १०० ताटे, टोपले, भातवाडी, बादल्या तसेच विद्यार्थ्यांसाठी आसनपट्ट्या असे एकूण दहा हजार रुपयांचे साहित्य भेट दिले.
गावकऱ्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची दीर्घकाळची अडचण दूर झाली असून शाळेतील मध्यान्ह भोजन व्यवस्था अधिक सुलभ झाली आहे. शाळेच्या वतीने तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने संबंधित सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी गावकऱ्यांची अशीच साथ लाभत राहावी, अशी नम्र अपेक्षा शाळा प्रशासनाने व्यक्त केली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेळकोणी खुर्द येथे ‘मिशन आपुलकी’ उपक्रमांतर्गत गावकऱ्यांनी एकत्र येत शाळेस आवश्यक साहित्याची अमूल्य भेट देत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. शासनाच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (शालेय पोषण आहार) अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज मध्यान्ह भोजन दिले जाते. विद्यार्थ्यांचे कुपोषण कमी करणे, शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि शाळाबाह्य गळती रोखणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. शाळेत या योजनेची अंमलबजावणी नियमितपणे होत असली तरी जेवणासाठी आवश्यक ताटे व स्वयंपाक साहित्याच्या अभावामुळे काही अडचणी निर्माण होत होत्या.
ही बाब लक्षात घेऊन गावातील विश्वनाथ अडबलवार, दत्तात्रय कुलकर्णी, सुजित डोंगरे, सचिन अनमुलवाड, राजेंद्र गरकेवाड, शंकरराव रेड्डी, गणपत वाघमारे, प्रल्हाद कापावार, किशन मळेकरी, शंकर बाळके, राजेंद्र कापावार, प्रल्हाद बासरे, सज्जन बाळापुरे, दत्ता यारावाड, काशिनाथ रेड्डी, राजू शिळेकर, रामकिशन यरकलवाड, संदीप बाळके व ज्ञानेश्वर यरकलवाड यांनी पुढाकार घेत ‘मिशन आपुलकी’ अंतर्गत शाळेस १०० ताटे, टोपले, भातवाडी, बादल्या तसेच विद्यार्थ्यांसाठी आसनपट्ट्या असे एकूण सुमारे दहा हजार रुपयांचे साहित्य भेट दिले.
गावकऱ्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची दीर्घकाळची अडचण दूर झाली असून शाळेतील मध्यान्ह भोजन व्यवस्था अधिक सुलभ व सुस्थितीत झाली आहे. शाळा व्यवस्थापन समिती व सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने संबंधित दात्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी गावकऱ्यांची अशीच साथ लाभत राहावी, अशी अपेक्षा शाळा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Leave a reply













