SR 24 NEWS

सामाजिक

डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे विद्यालयात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Spread the love

राहुरी : कारवाडी (मालुंजे खुर्द) येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त १०१ रोपांचे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विद्यार्थ्यांची रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी तसेच विविध आरोग्यविषयक समस्यांची तपासणी करण्यात आली. हे शिबिर श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट संचलित आयुर्वेद महाविद्यालय श्री शिवाजीनगर व फार्मसी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.

कार्यक्रमात आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. चोखर, डॉ. तुपे, डॉ. विलास कड व इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, फार्मसी कॉलेजने कारवाडी विद्यालयाला पुढील पाच वर्षांसाठी आरोग्य व्याख्यान व औषध सहकार्य यासाठी दत्तक घेतले.वृक्षारोपण कार्यक्रमात बकुळ, सप्तपर्णी, साग, अशोका यासारख्या १०१ वृक्षांचे रोपण माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब लोखंडे, स्वाती कवडे (लोकनियुक्त सरपंच, माहेगाव), तुकाराम अण्णा थेवरकर, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर माऊली पवार, बबनराव बोरुडे, उद्धवराव थेवरकर, नारायण रिंगे, भगीरथ पवार, राजेंद्र बोरुडे, चांगदेव देठे, डॉ. सर्जेराव सोळुंके, साईनाथ लोखंडे, अण्णासाहेब खाडे (माजी मुख्याध्यापक), बाळासाहेब बोंबले (सेवानिवृत्त शिक्षक), किशोर पवार, सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य प्रदिप तनपुरे यांनी केले. त्यांनी विद्यालयातील नवोपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थिनी प्रगती म्हस्के, प्रगती पवार, सविता दळवी, ईश्वरी पवार, मयुरी लोखंडे, सविता शेळके यांनी अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांना मोगऱ्याचे रोप भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

प्रसाद तनपुरे यांनी आपल्या भाषणात वृक्षांचे व आरोग्याचे महत्त्व पटवून देत, भविष्यासाठी त्याची गरज अधोरेखित केली. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!