SR 24 NEWS

जनरल

चिकन विक्रेत्याच्या संतापजनक प्रकारामुळे सकल हिंदू समाजाचा लोणी खुर्द कडकडीत बंद ; लोणी पोलीस स्टेशनला मोर्चा

Spread the love

राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : लोणी खुर्द (ता. राहाता) येथे चिकन विक्रेत्याने चिकन ड्रममध्ये जाणीवपूर्वक लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप उसळला आहे. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून, अन्नदूषणासारख्या गंभीर प्रकारामुळे सामाजिक तेढ निर्माण झाल्याने आज, १२ मार्च २०२५ रोजी लोणी खुर्द कडकडीत बंद पाळण्यात आला.हा प्रकार ग्रामपंचायत हद्दीत घडला असून, संबंधित आरोपीचा व्हिडिओ काही ग्रामस्थांनी सार्वजनिक ठिकाणी उघड केला. या प्रकरणावर ग्रामपंचायतीने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

या निषेधार्थ सकल हिंदू समाज, सनातन हिंदू महाराज संस्था, तृतीयपंथी समाज, व्यावसायिक, दुकानदार, विद्यार्थी आणि हजारो ग्रामस्थांनी वेताळबाबा चौकातून लोणी पोलीस ठाण्याकडे भव्य मोर्चा काढला.

पोलीस उपअधीक्षक वमने साहेब यांना दिलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या:1. चिकन विक्रेत्यावर धार्मिक भावना दुखावणे, सामाजिक तेढ निर्माण करणे, जाणीवपूर्वक अन्नद्रव्यामध्ये अपवित्र व विषारी पदार्थ मिसळणे, आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई करण्यात यावी, 2) सदर आरोपीचे दुकान तात्काळ बंद करून कायमस्वरूपी परवाना रद्द करण्यात यावा तसेच अशा प्रकारांना ग्रामपंचायतीकडून मिळणारे मूक समर्थन थांबवावे व तपास करून जबाबदारांवर कारवाई करावी.

या प्रकरणामुळे लोणी खुर्दमध्ये तीव्र संतप्त वातावरण आहे. पोलिसांनी योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!