तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : आई -वडील-ज्येष्ठ बंधू यांचे सुसंस्कार, त्याग व सर्वसामान्यांची असलेली नाळ हृदयापासून कायम ठेवून जिल्हा परिषद गटातील अडचणी, समस्या दूर करण्यासाठी आपण निस्वार्थ भावनेने काम करणार असल्याचे ग्वाही उबाटा गटाचे अटीतटीच्या निवडणुकीत विजय संपादन केलेले डॉ. जितेंद्र कानडे यांनी आपली भावना स्पष्ट केली.
वास्तविक पाहता ही निवडणूक अस्तित्वाची होती हे खरे असले तरी सर्वसामान्य मतदार व कळत नकळत सहकाऱ्यांची भूमिका कामाला आली. या मतदारसंघात आजतागायत प्रस्थापितांचे वर्चस्व होते, मात्र अणदूर गटातील सर्वच मतदारानी ही निवडणूक पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व देऊन आदर्श निर्माण केल्याचे सांगितले.
राजकारणात कोणीच कोणाचा मित्र व शत्रू नसतो हे ह्या निवडणुकीत सिद्ध झाल्याचे सांगून आपण केवळ निमित्त असून या विजयाचे शिल्पकार शेतमजूर – शेतकरी-युवा तरुण- माता भगिनी विशेषतः अप्रत्यक्ष सहकारीच असल्याचेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.आगामी पाच वर्षात सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी व विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचेही स्पष्टपणे सांगितले.
या निवडणुकीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या मतदारांचे ऋण शब्दात व्यक्त करणे अशक्य असल्याचे सांगून तुळजापूर तालुक्याचे काँग्रेसचे अध्यक्ष तथा सरपंच रामचंद्र आलूरे, बाळकृष्ण पाटील, बालाजी घुगे, संजीव आलूरे, श्रीकांत अणदूरकर, मधुकर अण्णा बंदपट्टे, प्रताप घोडके, मल्लिकार्जुन नरे, डॉ. पंकज घुगे, रमेश अण्णा मुळे, बबन शिंदे ,सचिन शिंदे ,बालाजी शिंदे, बलभीम मनशेट्टी, हनुमंत काळे, संभाजी बोबडे, देवकते गुरुजी, विलास भोसले, किरण जाधव, राम भोसले, विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे जुने सहकारी सह असंख्य सहकार्याने प्रयत्न केल्याने आपला विजय झाल्याचे सांगितले.
आगामी काळात राजकारणाला महत्व न देता केवळ विकासाला प्राधान्य देऊन सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले.
Leave a reply













