मानोरी :मांजरी येथील अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोनई पोलीस स्टेशनचे पीएसआय आदरणीय श्री. बाबासाहेब लबडे साहेब व ग्रामीण कवी आनंददादा साळवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान चंद्रगिरी देवस्थान, मांजरीचे विश्वस्त आदरणीय भाऊसाहेब पाटील विटनोर यांनी भूषविले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सोपानकाका विटनोर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीणभाऊ विटनोर, कचरू पाटील जंगले, कवी गोरक्षनाथ पवार, डॉ. कर्जुळे सर, सोनई कॉलेजचे प्राध्यापक गवांदे सर, नंदूभाऊ कर्जुळे, आदरणीय नवनाथ भाऊ जंगले यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संजीवनीआपल्या भाषणात पी.एस.आय. बाबासाहेब लबडे यांनी अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातील शैक्षणिक संजीवनी असून उच्च गुणवत्तेचे शिक्षण देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले.
ग्रामीण कवी आनंददादा साळवे यांनी आपल्या बहारदार कवितांमधून पालक व उपस्थितांची मने जिंकली. अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोठ्या संख्येने पालक उपस्थित राहतात, हेच या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे माहेरघर असल्याचे त्यांनी नमूद केले.स्कूल कमिटीचे अध्यक्ष सोपानकाका विटनोर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, अष्टविनायक स्कूल, चे सर्वेसर्वा आदरणीय होन सर यांच्या प्रयत्नांमुळेच या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. होन सरांनी या परिसरात स्कूल सुरू करावे अशी आम्ही मागणी केली व सरांनी आमची मागणी मान्य करून स्कूल सुरू केले आमच्या पाल्यांची उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची सोय परिसरात झाली असे गौरवोद्गार स्कूल कमिटीचे अध्यक्ष यांनी काढले
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील विटनोर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, माझे दोन्ही मुलं अष्टविनायक इंग्लिश मीडियम स्कूल तांदुळवाडी या स्कूलमध्ये शिक्षण घेतलेले आहे व ते आज जीवनात यशस्वी झाले आहे याचा मला खूप आनंद होत आहे आणि उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळाल्यामुळे आजही. ग्रामीण भागात दुसरी शाखा सुरू व्हावी यासाठी पालकांच्या आग्रहातून प्रयत्न झाले आणि ते यशस्वी केल्याबद्दल त्यांनी होन सरांचे विशेष कौतुक केले. शाळेला भविष्यात कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तयार असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले
संस्थेच्या वतीने आदरणीय मोहिनीराज होन सर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता संस्था गुणवत्तेवर भर देत दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी मला माहीत आहेत. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी उच्च उच्चशिक्षित होणे हेच आमच्या संस्थेचे ध्येयआहे असे होन सरांनी सांगितले
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या गीताने झाली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांनी व पारितोषिक संपूर्ण कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या वेळेला छोट्या छोट्या मुलांनी उत्कृष्ट प्रकारे नृत्य करून पालकांचे व प्रेक्षकांचे मन जिंकली तर यामध्ये देशभक्तीपर गीते सामाजिक अध्यात्मिक अशा विविध प्रकारच्या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी पालकासह परिसरातील अनेक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धेमधील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते हस्ते मेडल व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री खंडागळे मॅडम, भावना शिंदे मॅडम यांनी केले यावेळी अष्टविनायक स्कूलचे गोरक्षनाथ होन, सानिका वाकचौरे, सोनाली सगळगिळे, मंजुषा खरात, विजया शिंदे, निकिता शिंदे, गौरी म्हसे, किरण जाधव, दत्तात्रेय लांगे, सुरेश वैरागर, निलेश गायकवाड, अनिल मगर, मोहन जाधव, संदीप जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले
अष्टविनायक इंटरनॅशनल स्कूल, मांजरी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न

0Share
Leave a reply












