राहुरी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी शहर व तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या राहुरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर काही स्वयंघोषित व्यक्तींकडून संशय निर्माण करण्याचा व बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. सोशल मीडियासह काही माध्यमांद्वारे अपप्रचार केला जात असल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप होत आहे.
राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत शेकडो हरवलेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कार्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली गेली असून, विविध क्षेत्रांतून राहुरी पोलिसांच्या कार्याचे कौतुकही होत आहे. तसेच नगर–मनमाड महामार्गावरील रस्ता दुरुस्तीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राहुरी पोलीस अधिकारी व अंमलदार दिवस-रात्र परिश्रम घेत आहेत. असे असताना, पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या काही व्यक्तींनी वैयक्तिक आकसातून किंवा स्वार्थातून कोणतेही ठोस पुरावे नसताना सोशल मीडियावर अफवा पसरवून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये गैरसमज पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी, अवैध व्यवसायांवर कारवाई तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जात आहेत. पोलिस प्रशासन आपले कर्तव्य पूर्णतः पारदर्शक व कायद्याच्या चौकटीत बजावत असल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे. दरम्यान, कोणतेही आरोप करताना त्यामागील तथ्यांची खातरजमा करणे आवश्यक असून, अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या स्वयंघोषित व्यक्तींपासून नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन राहुरी पोलिसांनी केले आहे.
राहुरीत काही स्वयंघोषित व्यक्तींकडून पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न?, सोशल मीडियावर अपप्रचार; पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे षड्यंत्र असल्याची चर्चा

0Share
Leave a reply












