अहिल्यानगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर येथील पोलिस मुख्यालयात ड्युटीवर असणारे पोलिस अंमलदार जयराम बाजीराव काळे (वय ३४, रा. कजबे वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता झाले असून, त्यांच्या बेपत्तेपणाची नोंद त्यांच्या पत्नीने तोफखाना पोलिस ठाण्यात केली आहे.अंमलदार काळे हे सोमवार, दि. ७ जुलैपासून अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी व परिचितांनी विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे मंगळवार, दि. ८ जुलै रोजी त्यांच्या पत्नी आश्विनी जयराम काळे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सदर तक्रारीवरून अंमलदार जयराम काळे यांची बेपत्ता व्यक्ती म्हणून नोंद घेतली असून, शोधमोहीम सुरू केली आहे. त्यांचे बेपत्ता होण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार रमेश थोरवे करीत आहेत. पोलिसांकडून काळे यांचा तपशीलवार मागोवा घेतला जात असून, सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स आणि नातेवाईकांकडील माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातील पोलीस अंमलदार बेपत्ता; पत्नीची तोफखाना पोलिसात तक्रार, शोध सुरू

0Share
Leave a reply












