SR 24 NEWS

अपघात

आमदार पुत्राच्या आलीशान कारची मोटारसायकला जोराची धडक ; अपघातात पारनेर येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू!

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्या कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील नितीन प्रकाश शेळके (वय 34) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 7) रात्री साडेदहा वाजेदरम्यान अहिल्यानगर पुणे रस्त्यावर पारनेरच्या जातेगाव घाट फाट्यावर झाला. या प्रकरणी मंगळवारी दुपारी सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

स्वप्निल पोपट शेळके यांनी सुपा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सागर सुरेश धस (रा. आष्टी ता. आष्टी जिल्हा बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजेेदरम्यान नितीन शेळके अहिल्यनगर-पुणे महामार्गावर पळवे खुर्द शिवारातील जातेगाव फाट्यावर त्याच्या दुचाकीवरून रस्ता ओलांडत असतांना सागर धस याच्या आलिशान कारने पाठीमागून जोराची धडक दिली. सागर धस हा अहिल्यानगरकडून पुण्याच्या दिशेने निघाला होता. जोराची धडक बसल्याने नितीन शेळके यांना दवाखान्यात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीसह आलिशान कारचे मोठे नूकसान झाले आहे. पुढील तपास सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मंगेश नागरगोजे पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!