SR 24 NEWS

जनरल

टाकळीढोकेश्वर बसस्टँडवरील धोकादायक झाड हटवण्याची मागणी, प्रशासन मरायची वाट पाहतंय का? नागरिकांचा संतप्त सवाल

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावातील मुख्य बसस्थानकावर असलेल्या जीर्ण आणि धोकादायक स्थितीतील विलायती चिंचेच्या झाडामुळे प्रवासी व ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या झाडामुळे पूर्वी एकदा मोठी फांदी कोसळून दोन नागरिक जखमी झाले होते. नुकत्याच घटनेत पुन्हा एक फांदी कोसळली असली तरी सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या या ठिकाणी अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायतने याबाबत वारंवार फॉरेस्ट कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या झाडामुळे यापूर्वी एकदा मोठी फांदी पडून दोन नागरिक जखमी झाले होते. सुदैवाने नुकत्याच झालेल्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु हा प्रकार प्रवाशांच्या दृष्टीने व गावकऱ्यांसाठी धोकादायक बनला आहे. बसस्टँड हा गावातील नागरिकांचा दैनंदिन वापरातील महत्त्वाचा भाग आहे. येथे दररोज शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवासी यांची वर्दळ असते. जीर्ण झालेल्या झाडाची फांदी कधीही कोसळू शकते, ज्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिक नागरिक संकेत झावरे पाटील यांनी ग्रामपंचायतीला इशारा देत, लवकरात लवकर हे झाड काढून टाकण्याची मागणी केली आहे. अन्यथा, आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. वनविभाग कार्यालय आणि ग्रामपंचायतीने समन्वयाने त्वरित पावले उचलून हे जीर्ण झाड काढावे, अशी अपेक्षा आहे. यामुळे संभाव्य दुर्घटना टळून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी मिळेल. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांचा असंतोष वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामपंचायतीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या धोकादायक झाडाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. हे झाड बसस्टँडवरून ये-जा करणाऱ्या जीवितास सतत धोका निर्माण करत आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे,काल पुन्हा चिंचेचे झाडाची फांदी कोसळूनही प्रशासनाला जाग नाहीच, मरायची वाट पाहतंय का? प्रशासनाला जाग आली नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कारण कधीही मोठी दुर्घटना घडू शकते. झाड काढले नाही तर आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल.

संकेत झावरे (युवा नेते)


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!