राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातुन सोलर पंप मिळवुन देतो असे खोटे सांगुन राहुरी तालुक्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना फसवुन करुन त्यांच्याकडुन वेगवेगळ्या रक्कमा घेऊन त्यांना सोलपंप सेट न देता त्यांची फसवणुक करणारा इसमानामे संदिप दिलीप बोडखे रा. टाकळीभान ता. श्रीरामपुर यास राहुरी पोलीस स्टेशन येथे गु र न 1) 713/2025 बी एन एस 318(4) दी.26/06/2025 रोजी गुन्ह्यात अटक केली असता दी.30/06/2025 पर्यंत पोलीस कोठाडी मिळाली तसेच 2) गु र न 714/2025 बी एन एस 318(4)मध्ये दी.30/06/2025 रोजी अटक केली असता दी.03/07/2025 रोजी पर्यंत पोलीस कस्टडीत आहे.
तसेच सदर आरोपीवर शेवगाव, नेवासा पोलीस स्टेशन येथे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी फसवणुकीचे अशाच प्रकार गुन्हे दाखल आहेत. तरी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना अव्हाण करण्यात येते की, अशाच प्रकारचे नमुद आरोपीने ज्या शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि. अहिल्यानगर, श्री. डॉ. बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय आर. ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोउपनि. राजु जाधव, पोहेकॉ. हनुमंत आव्हाड, पोकॉ. गणेश लिपने यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि. राजु जाधव हे करत आहेत.
शासकीय अनुदानातुन सोलर पंप मिळवुन देण्याचे खोटे आमीष दाखवणारा भामटा राहुरी पोलीसांच्या जाळ्यात

0Share
Leave a reply












