सोनई प्रतिनिधी / मोहन शेगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोनई शाखेतील शाखा व्यवस्थापक पोपटराव रामचंद्र शेटे हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावान सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवापुर्तीच्या निमित्ताने सोनई शाखेत भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पोपटराव शेटे यांनी सन १९९१ साली जिल्हा बँकेत सेवेला सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी शेवगाव टाउन शाखेत काही काळ सेवा दिली. त्यानंतर वांबोरी, बेलपिंपळगाव, मुळा फॅक्टरी आणि शेवटी सोनई या ठिकाणी त्यांनी बँकेची सेवा बजावली. त्यांच्या शांत, संयमी आणि समर्पित कार्यपद्धतीमुळे ते ग्राहकप्रिय झाले होते.
शेटे हे केवळ बँकेपुरतेच मर्यादित न राहता, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातही सक्रिय राहिले आहेत. शनिशिंगणापूर देवस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांचे कार्य आजही सुरू असून, त्यामध्ये माजी खासदार ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख आणि माजी मंत्री शंकरराव गडाख पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सत्कार समारंभात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
यामध्ये सोनई सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन जनार्धन कुसळकर, बेल्हेकरवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन दत्तात्रय बेलेकर, मुळा सहकारी साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले, माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे पीएस शरदराव बेलेकर, विजय श्री मजूर संस्थेचे चेअरमन भानुदास शिंदे, मुळा कारखाना पगारदार पतसंस्थेचे व्यवस्थापक विजय गोरे, सोसायटीचे व्यवस्थापक आणि इतर अनेक मान्यवरांचा समावेश होता.
कार्यक्रमात वक्त्यांनी शेटे यांच्या सेवाभावी कार्याची स्तुती करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँकेचे सोनई शाखा व्यवस्थापक पोपटराव शेटे सेवेनिवृत्त; सहकाऱ्यांकडून भावनिक सत्कार

0Share
Leave a reply












