राहुरी वार्ताहर : गोटुंबे आखाडा येथील महिलेच्या घरात गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती शेजारील नागरिकांकडून तसेच त्या परिसरातुन रस्त्याने नेहमी प्रवास करण्याऱ्या नागरिकांकडून माहिती समोर समोर आली असून, गावातील एका ठिकाणी काही महिला मिळून वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा शेजारील नागरिकांना संशय आहे. त्यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, संबंधित काही महिलेच्या घरात वारंवार नवनवीन परपुरुष व महिला तोंड बांधून येत असल्याचे वारंवार दिसून येते.
तसेच या व्यक्ती काही वेळासाठी घरात थांबतातआणि म्हणजे, त्या दरम्यान घराचा दरवाजा बाहेरून बंद केला जात असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले आहे. काही मर्यादित वेळेनंतर त्या व्यक्ती घराबाहेर निघताना त्या परिसरातील अंदाज घेऊन तोंडाला बांधून भुर्रर्र होत असल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले आहे. या वाढत्या घटनेमुळे त्या ठिकाणी काही गावातील तरुणांची वर्दळही वाढलेली असून, तसेच त्या परिसरातील नागरिक संतापलेले असून त्या परिसरात अस्वस्थता आणि चिंता व्यक्त होत आहे.
सामाजिक वातावरण बिघडण्याच्या भीतीने नागरिकांनी यास विरोध दर्शवला असून, अशा गैरकायदेशीर कृत्यांना त्वरित आळा घालण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गावातील समाजसेवक तसेच ग्रामपंचायतने व पोलीस प्रशासनाने या गोष्टीवर वेळीच आळा घालणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Leave a reply













