SR 24 NEWS

सामाजिक

उमरगा-अणदूर शटल बस सेवा सुरू, प्रवासी व विद्यार्थ्यातून समाधान

Spread the love

अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : राष्ट्रीय महामार्गावरीलल उमरगा ते अणदूर शटल बस सेवा सुरु झाल्याने प्रवाशातून विशेषतः विद्यार्थ्यातून समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.उमरगा ते अणदूर शटल बसचे उद्घाटन रविवार दिनांक 29 रोजी ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले. तर चालक राजू सुरवसे व वाहक तुळशीदास घोडके यांचा शाल फेटा पुष्पहार घालून पत्रकार शिवशंकर तिरगुळे व पत्रकार सचिन तोग्गी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी सुनियोजित बस सेवा करून मराठवाड्यात उत्पन्नात अग्रेसर करून दाखवल्याने त्यांचाही अभिनंदन करण्यात आले.

यावेळी बोलताना बालाजी घुगे म्हणाले की, अणदूर हे जवळपास 30 हजार लोकवस्तीचे गाव असून प्रसिद्ध खंडोबाचे मंदिर, अग्रेसर शैक्षणिक संस्था, मोठी बाजारपेठ, प्रवाशांची वर्दळ याबाबत पाठपुराव्यची दखल घेऊन बस सुरू झाल्याने समाधान व्यक्त करून तुळजापूर आगाराची अणदूर मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी केली.

यावेळी उमरगा वाहतूक नियंत्रक अतुल बारभाई, अणदूर वाहतूक नियंत्रक राजू चव्हाण, डॉ. शशिकांत तोडकरी, दयानंद मुडके, लक्ष्मण नरे, चंद्रकांत हगलगुंडे, प्रवीण घोडके, सुभाष गळाकाटे, अमोल महाबोले, वैजनाथ मुळे, सुरेश तोडकरी, छोटू घुगे, खंडू व्हनाले, बाबा तांबोळी सह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!