श्रीगोंदा प्रतिनिधी : श्रीगोंदा पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांची नुकतीच शासनाच्या आदेशानुसार बीड, अहमदनगर (अहिल्यानगर), पारनेर आदी ठिकाणी बदली झाली. या निमित्ताने दिव्यांग संघटना श्रीगोंदा यांच्या वतीने निरोप व सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या हस्ते बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या वेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी निकम साहेब यांनीही उपस्थित राहून आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पोलीस दलातील एकात्मता व जनतेशी असलेले नाते यावर प्रकाश टाकत बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग संघटनेचे श्रीगोंदा अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्यावतीने करण्यात आले होते.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधील बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा दिव्यांग संघटनेतर्फे सन्मान

0Share
Leave a reply











