SR 24 NEWS

जनरल

भारत कवितके यांची धनगर समाज विकास मंडळाच्या प्रवक्ते पदी नियुक्ती.

Spread the love

एसआर 24 न्यूज़ न्यूज नेटवर्क मुबंई : मुंबई मधील कांदिवली उपनगरातील जेष्ठ पत्रकार साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांची धनगर समाज विकास मंडळ मुंबईच्या प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असल्याचे निवड पत्र देऊन मंडळाने अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.भारत कवितके यांची आज पर्यंत ची सामाजिक क्षेत्रातील कामगीरी निस्वार्थ पणाची व प्रामाणिक पणाची आहे.त्यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य कृतीशील क्रियाशील आहे.मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता कांदिवली पश्चिम येथील चारकोप येथे मंडळातर्फे पदाधिकारी व समाज बांधव यांच्या उपस्थितीत सामुदायिक रीत्या भारत कवितके यांना प्रवक्ते पदी निवड झाल्याचे निवड पत्र दिले.

या प्रसंगी भारत कवितके, आप्पासाहेब कुचेकर, संतोष पिसे, मल्हारी लाळगे, शिवाजी पिसे, नारायण पिसे, मधुकर कुचेकर, राजेश कुचेकर, महेंद्र काळे,सागर पिसे, सदानंद लाळगे, निवृत्ती भोजणे, सुनील पिसे, सुनील भगत, महेश कुचेकर, मुकेश पिसे सह इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!