नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : नांदगाव तालुक्याचे विकास पुरुष लोकप्रिय आमदार माननीय सुहास अण्णा कांदे यांच्या विकास निधीतून हे काम देण्यात आले आहे. याप्रसंगी जनतेतून एकच आवाज ऐकायला मिळाला तो म्हणजे इतका विकास करणारा आमदार आम्ही पहिल्यांदाच बघत आहोत. असेच विकास पुरुष असेच आमदार आपल्याला परत परत लाभो अशीच सर्वांची कुजबुज होती तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते काळू शिंदे, दिलीप सातपुते, भगवान सातपुते, भागवत शर्माळे, वाल्मीक निकम, सरपंच बाळू पाटील, खंडू कोळेकर, बंडू बाबा निकम, तसेच अनेक जणांच्या पाठपुराव्याला यश आले.
उद्घाटन प्रसंगी गावचे प्रथम नागरिक बाळू पाटील यांच्या हस्ते पूजा करून श्रीफळ चढविले याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य गावातील जेष्ठ मंडळी तरुण मंडळी महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता सर्वांना साखर वाटून गोड तोंड केले व मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
नांदगाव तालुक्यातील पिंपराळे येथे अहिल्यादेवी मंदिर व शेडच्या बांधकामाचे उद्घाटन संपन्न

0Share
Leave a reply












