SR 24 NEWS

जनरल

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्या परिषदेचा पीएचडी संशोधक धारकांबाबतचा अजब निर्णय..

Spread the love

नांदेड प्रतिनिधी/धम्मदिप भद्रे कांडाळकर : दिनांक.16/6/2023 रोजी, स्वारातीम विद्यापीठ नांदेड येथे विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेले विविध आधी सभा सदस्य यांच्यामार्फत एक अजब निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे.

केंद्र शासन व राज्य सरकारच्या विविध स्वायत्त संस्थांमार्फत पीएचडी करणाऱ्या मुलांसाठी आधी छत्र वृत्ती देण्यात येते. याचा उद्देश हा संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन व्यवस्थित पूर्ण करता यावे व त्या संशोधनाच्या माध्यमातून समाजाचं त्याचबरोबर देशाचे सर्वांगीण हित व्हावं हाच असतो. पण आपल्या विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीमध्ये जे संशोधक विद्यार्थी विविध संस्थे अंतर्गत फेलोशिप धारक आहेत अशा विद्यार्थ्यांनी संशोधन केंद्रामध्ये दररोज उपस्थित राहून चार तास काम करावे असा हुकूम जारी केला आहे. आणि ज्या संशोधन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना करण्यासाठी काम नाही अशा विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठाच्या सलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये काम करण्यासाठी पाठवावं असा निर्णय येथे घेण्यात आला.

कधीकाळी आपल्या विद्यापीठांतर्गत जे विद्यार्थी संशोधनाचे कार्य करतात आणि त्यांना कुठल्याच प्रकारची शिष्यवृत्ती नाही अशा विद्यार्थ्यांना मासिक आठ हजार रुपये हे विद्यापीठाकडून देण्यात येत होते. याचाही विसर या आधी सभा सदस्यांना पडला आहे की काय? असा प्रश्न पडतो.

सद्याची वास्तविकता पहाता 2020 च्या संशोधक विद्यार्थ्यांना दोन आडीच वर्ष होऊन त्यांना फेलोशिप लागु होऊन अद्याप त्यांच्या खात्यात दमडीही जमा करण्यात आली नाही त्या संशोधक विद्यार्थीने कसे करावे याचे उत्तर विद्यापरीषद देणार आहे का? चला हरकत नाही विद्यापीठाने विद्यार्थी हितासाठी हा चार तासाचा अधिभार विद्यार्थ्यावर टाकला असं समजूयात, पण जो पर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यात फेलोशिप जमा होत नाही तो पर्यंत तरी निदान फक्त एकदा संशोधक विद्यार्थ्यांची वास्तविकता जाणुन घेण्यासाठी आपण आपली मासीक पगार विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बरोबर जमा करण्याचा निर्णय फक्त 6 महीण्यासाठी विद्यापिठसलग्न महाविद्यालमधे लागु करावा नंतर संशोधक विद्यार्थीला 4 तास नाही 24 तास वर्कलोड द्यावा..
तसेच वर्कलोडच्या कालावधीमध्ये संशोधक विद्यार्थ्यांना किमान बसण्यासाठी एक खुर्ची, एक टेबल पिण्याचे पाणी, हे उपलब्ध करून दिले जाणार आहे का? पुस्तके मासिके, ही पुरवली जातील का?? फिल्ड वर्क वर काम करत असताना त्या विद्यार्थ्यांना यातून सूट मिळेल का? आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्षेत्र मराठवाडा महाराष्ट्र आहे आशा विद्यार्थ्यांना यातून सूट मिळेल का? असे विविध प्रश्न आज अनुत्तीर्ण आहेत.

विद्यापीठ विद्यार्थी विकासासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविते पण त्याची वास्तविकता ही थोडी वेगळीच आहे. चार तास विद्यार्थ्यांना कामाला लावून तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना घरी पाठवण्याची तयारी विद्यापीठ करत आहे का? विविध प्रश्न यातून उद्भवतात. विद्यापीठ प्रशासनाला तात्काळ विनंती आहे. विद्यापीठ परिसरामध्ये व विद्यापीठांतर्गत विद्यार्थी त्यासाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची एकदा पाहणी करून त्यांचे सामाजिक अंकेक्षण करावे व विद्यार्थी हिताचा निर्णय घेणे अगोदर किमान त्या विद्यार्थ्यांना विचारण्याची तसदी हे विद्यापीठ घेईल हीच अपेक्षा आहॆt


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!