अणदूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : दर्पण दिनाचे औचित्य साधून जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने २०२६ या वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन तसेच तुळजापूर येथील दै. सकाळचे ज्येष्ठ पत्रकार यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेच्या कार्याचा गौरव म्हणून कै. शिवशंकर आलुरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम बुधवार, दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता अणदूर येथील हुतात्मा स्मारक सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. मधुकरराव चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रामचंद्र आलुरे (सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, अणदूर), मा. श्री. नागनाथ कुंभार (उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, अणदूर), मा. श्री. डॉ. जितेंद्र कानडे (संस्थापक, श्री श्री गुरुकुल, अणदूर) तसेच मा. श्री. सचिन यादव (पोलीस निरीक्षक, नळदुर्ग) हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी तुळजापूर येथील दै. सकाळचे पत्रकार मा. श्री. जगदिश पुरुषोत्तम कुलकर्णी यांना कै. शिवशंकर आलुरे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन श्री. चंद्रकांत हागलगुंडे, श्री. अजय अणदूरकर, श्री. चंद्रकांत गुड्ड, श्री. दयानंद काळुंके, श्री. संजिव आलुरे, श्री. शिवशंकर तिरगुळे, श्री. सचिन तोग्गी व श्री. शिवाजी कांबळे यांच्या वतीने करण्यात आले असून या सोहळ्यास पत्रकार, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
दर्पण दिनानिमित्त जय मल्हार पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन व आदर्श पत्रकार पुरस्कार सोहळयाचे उद्या आयोजन

0Share
Leave a reply












