राहुरी ग्रामीण वेब प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील चिखलठाण परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी वारंवार तगादा लावत ‘तुला पळवून नेईन’ अशी धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) व पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखलठाण येथील पीडित मुलगी सध्या शिक्षण घेत आहे. संगमनेर तालुक्यातील खांबे वरंडी येथील अनिल भिमराज वाघ हा आरोपी गेल्या एक महिन्यापासून पीडितेचा सातत्याने पाठलाग करत होता. आरोपीने तिच्या राहत्या घरापर्यंत येऊन, “मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,” असे म्हणत वारंवार मानसिक त्रास दिला. तसेच तिला पळवून नेण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अनिल वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५१(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) २०१२ अंतर्गत कलम १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करत आहेत.
राहुरी तालुक्यातील चिखलठाण परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीकडुन तरुणीस लग्नासाठी वारंवार तगादा लावत पळवून नेण्याची दिली धमकी

0Share
Leave a reply












