नांदेड प्रतिनिधी / धम्मदीप भद्रे : नायगाव तालुक्यातील समाजकल्याण निवासी शाळेत दरवर्षीप्रमाणे यंदाही राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक शेख नवाज सर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वंदना घेऊन उपस्थितांनी अभिवादन केले.
कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रघडणीतील योगदान व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आजच्या पिढीसाठी असलेली प्रेरणा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग घेत जयंतीचे औचित्य साधले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक शेख नवाज सर, सहाय्यक शिक्षिका सौ. अश्विनी बेंद्रीकर मॅडम, सहाय्यक शिक्षक प्रदीप तुपकरे सर, कराळे सर, शरद इंगळे सर तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततामय व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
नायगाव येथील समाजकल्याण निवासी शाळेत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

0Share
Leave a reply












