SR 24 NEWS

इतर

वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी लोंढे तर उपाध्यक्षपदी मोरे

Spread the love

राहुरी फॅक्टरी  (प्रतिनिधी) : राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सुजित लोंढे तर उपाध्यक्षपदी नितिन मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर नवरात्र उत्सव जल्लोष साजरा करण्यात येतो.

दरवर्षी नवीन कार्यकर्त्यांना पदाधिकारी कमिटीत संधी दिली जाते यामध्ये कार्याध्यक्ष महेंद्र दोंड, व्यवस्थापक सुनील जाधव, खजिनदार सुजित सिनारे, सहखजिनदार सचिन कदम, संघटक बाळासाहेब वाळुंज,सल्लागार बाबासाहेब खांदे, सचिव संजय धुमाळ,सहसचिव अश्विन कदम,प्रसिद्धी प्रमुख गणेश भवार,सह प्रसिद्धीप्रमुख सोहम कदम, संपर्क प्रमुख कार्तिक कुटे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस संस्थापक वसंत कदम,अमोल कदम,जालिंदर दोंड,बाबासाहेब खांदे,सुनील जाधव, बापूसाहेब मुसमाडे,मयुर मोरे, मनोज गावडे,सचिन जाधव,प्रथमेश थोरात,महेंद्र दोंड,सुजित सिनारे,अक्षय पेरणे,बापूसाहेब काळे,बाबासाहेब खांदे व इतर सभासद उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!