प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे) : सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न 2025 पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना जाहीर करण्यात आला. धर्माचार्य श्री श्री श्री 1008 महामंडलेश्वर दत्तात्रय दहिवाल महाराज यांच्या शुभहस्ते पंडित यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.यावेळी ‘भावड्या’ चित्रपटाच्या शुभमुहूर्ताचाही समारंभ संपन्न झाला. शुभमुहूर्ताचे विधिविधान विखे फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील व डॉ. सारिकाताई नागरे यांच्या हस्ते पार पडले.
या कार्यक्रमाला अभिनेत्री सिद्धी गाडेकर, कलाकार ज्ञानदेव शिंदे, कैलास धनवटे, निर्माता आबा निर्मळ, पत्रकार प्रसाद मैड, सतीश कदम सर, बोराडे, ज्ञानेश्वर साबळे, रवी माळवे, डॉ. बेंद्रे श्रीकांत, सी.ए. डॉ. शंकर अदानी, अजय नागरे, संदीप मानकर, राजेंद्र कुलथे, अनिताताई माळवे, स्वातीताई मुंडलिक, श्यामभाऊ गोसावी, श्रीनिवास बनकर, अंबादास धनगर, पवनराजे गायकवाड, बालाजी पोतदार, उमेश काजळे, अभिजीत पेडगावकर, अशोकाकाका मैड, नारायण लोळगे, मेजर शेवंती, गोकुळ चिंतामणी साहेब, श्रीपाद बोकंद व सोमनाथ आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट झाला. मान्यवरांनी प्रमोद पंडित यांच्या कलात्मक वाटचालीचे कौतुक करत त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सुवर्ण भरारी संस्थेचा राज्यस्तरीय कलारत्न 2025 पुरस्कार अभिनेता-दिग्दर्शक प्रमोद पंडित यांना

0Share
Leave a reply












