तुळजापूर, दि. 13 (प्रतिनिधी – चंद्रकांत हगलगुंडे) : तुळजापूर तालुक्यात गेली तीन दशके राजकारणातील हुकमी एक्का म्हणून ओळख असलेले समाजवादी पक्षाचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांनी आज शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश केला. मुंबईतील मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’, मलबार हिल येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र साळवी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राजेंद्र सापणे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, अर्जुन सलगर आदी मान्यवर उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यात देवानंद भाऊ रोचकरी यांचा मोठा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचा मजबूत पाया असून, त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हाला बळ मिळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गावोगावी स्थापन झालेल्या देवानंद भाऊ मित्र मंडळांच्या शाखांमुळे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. ग्रामीण भागात “सर्वसामान्यांचा तारणहार” म्हणून त्यांची विशेष ओळख आहे.
ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रवेशामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “देवानंद भाऊंच्या नेतृत्वामुळे तालुक्यात शिवसेना आणखी बळकट होईल”, अशी प्रतिक्रिया धाराशिव जिल्हा देवानंद भाऊ मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी दिली.या प्रवेश सोहळ्यास अण्णासाहेब गुंड, महावीर मुळे, शिवाजी कांबळे, उदय भोसले, दिलीप लोमटे, पांडुरंग बोंगरे, सर्जेराव लोमटे, विशाल रोचकरी, हनुमंत जाधव, राहुल जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातील समाजवादी पक्षाचे नेते देवानंद भाऊ रोचकरी यांचा शिवसेनेत प्रवेश, कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव, तुळजापूर तालुक्यात धनुष्यबानाला बळ

0Share
Leave a reply












