तुळजापूर प्रतिनिधी (चंद्रकांत हगलगुंडे) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय बसस्थानक स्वच्छता अभियानांतर्गत सोलापूर विभाग नियंत्रक अमोल गोंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अणदूर बसस्थानकाची स्वच्छता आणि प्रवाशांच्या गैरसोयींची पाहणी करण्यात आली.या पाहणीदरम्यान सोलापूर कामगार अधिकारी परशुराम नकाते, तुळजापूर आगार प्रमुख राम शिंदे, वाहतूक नियंत्रक राजकुमार चव्हाण, वाहतूक निरीक्षक सुरज पायाळ, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गायकवाड, पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे तसेच प्रवासी मित्र सिद्धेश्वर मसुते यांच्यासह प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रवासी मित्र सिद्धेश्वर मसुते यांनी विद्यार्थी, प्रवासी आणि भाविकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थी आणि भाविकांसाठी अपुऱ्या बसेस उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. जवळपास नऊशेहून अधिक विद्यार्थी दररोज अणदूर बसस्थानकावरून प्रवास करतात. मात्र, बसेसची संख्या अपुरी असल्याने त्यांना प्रचंड गैरसोय होते. तसेच बाहेरील आगारांच्या बसेस उड्डाण पुलावरून थेट प्रवास करतात, ज्यामुळे स्थानकावरील प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते.”
या तक्रारींवर विभाग नियंत्रक अमोल गोंजारे यांनी बसस्थानकातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सोलापूर–नळदुर्ग आणि उमरगा–अणदूर या बस फेर्या कायम ठेवण्याची ग्वाही दिली. या पाहणी प्रसंगी सिद्राम गवळी, सुरेश तोडकरी, जयकुमार आलूरे, आजी बाळ गायकवाड, सरोजनी मुळे, अन्वर शेख, अमोल महाबोले, बाबा तांबोळी, खंडू व्हणाळे आदी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे बसस्थानक स्वच्छता अभियानाची सोलापूर विभाग नियंत्रकांकडून पाहणी, प्रवाशांनी मांडल्या गैरसोयींच्या तक्रारी

0Share
Leave a reply












