SR 24 NEWS

इतर

मोमीन आखाडा जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी स्नेहमेळावा व वॉटर फिल्टर उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / सोमनाथ वाघ : शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोमीन आखाडा येथे माजी विद्यार्थी स्नेहमेळावा तसेच लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या वॉटर फिल्टरच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला.यावेळी घार्गे पाटील कांगोणी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट टी-शर्टचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमानिमित्त शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघ समिती स्थापन करण्यात आली.

या समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली असून अध्यक्ष रवींद्र मारुती कदम, उपाध्यक्ष श्जमीरभाई देशमुख, कोषाध्यक्ष ज्ञानदेव (माऊली) गाडे, सचिव मुख्याध्यापक श्री. बाचकर सर, सल्लागार अमोल भालेराव, तर सदस्य म्हणून वसीमभाई शेख, भारत गाडे, गोरक्षनाथ कोहकडे, इम्तियाज शेख, करण जाधव, भारत कोहकडे, अनिसभाई शेख, अन्वरभाई शेख, मच्छिंद्र ठाकर, अनिल (बाळासाहेब) कदम, अमोल गाडे, युनूसभाई शेख, निजामभाई शेख, ताहीरभाई शेख, फिरोजभाई शेख यांची निवड करण्यात आली.

मुख्याध्यापक श्री. बाचकर सर यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच लोकसहभागातून उभारलेला वॉटर प्यूरीफायर, मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून प्राप्त डिजिटल बोर्ड, साऊंड सिस्टीम व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटनही या कार्यक्रमात करण्यात आले.

कार्यक्रमाला पोलीस पाटील श्री. संजय शिंदे, सरपंच रावसाहेब शिंदे, उपसरपंच मच्छिंद्र (अण्णा) कदम, माजी सरपंच अशोकराव कोहकडे, जुम्माभाई शेख, लक्ष्मण (बाबा) शिंदे, पोपट महाराज शिंदे आदी मान्यवरांसह शाळेतील शिक्षक श्री. नगरे सर, श्री. भालेकर सर, श्रीमती होडगर मॅडम, श्रीमती जेजुरकर मॅडम, श्रीमती धस मॅडम, श्रीमती रोडे मॅडम, श्री. तमनर सर तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्नेहमेळाव्यामुळे माजी विद्यार्थी, शिक्षक व गावकऱ्यांमधील आपुलकीचे बंध आणखी दृढ झाले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!