नांदेड प्रतिनिधी / धम्मदिप भद्रे : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पार्टी आणि एनडीए ला मिळालेला विजय हा देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास आणि विश्वासाचा विजय आहे. आगामी काळातही देशातील कानाकोपऱ्यातील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा विजय होईल असा विश्वास खा.डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला असून बिहारमधील ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खा. गोपछडे यांनी जाहीर अभिनंदन केले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते . या निवडणुकीत बिहार मधील मतदारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षावर प्रचंड विश्वास दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेला विकास तसेच आतंकवाद दहशतवाद आणि भ्रष्टाचाराचे केलेले उच्चाटन , रोजगाराच्या असंख्य नवीन संधी , विकासाचा समतोल आणि प्रत्येक भारतीयांमध्ये निर्माण केलेला आत्मविश्वास यामुळे बिहार निवडणुकीतही तेथील मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. हा ऐतिहासिक विजय मिळवून देणारे देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खा. डॉ. गोपछडे यांनी जाहीरपणे अभिनंदन केले आहे.
देशातील जनतेला भ्रष्टाचार, घराणेशाही नाही तर पारदर्शक लोकशाही हवी आहे आणि ही लोकशाही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात टिकून राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.शिवाय ते म्हणाले की , बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात होणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाची सत्ता स्थापन होईल. नांदेड महापालिकेवर , नांदेड जिल्हा परिषदेवर , जिल्ह्यातील पंचायत समिती आणि नगरपरिषद , नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्ष प्रचंड बहुमताने सत्तेत येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बिहार मधील भाजपा एनडीए चा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास आणि विश्वासावरील विजय : खा. गोपछडे

0Share
Leave a reply












