तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हागलगुंडे : तुळजापूर तालुक्याचे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा उद्योजक अशोक भाऊ जगदाळे यांनी टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता जानकरातून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या रणधुमाळीत या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा पाठबळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. होऊ घातलेल्या नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत धक्का तंत्राचा वापर कुणाच्या पथ्यावर पडणार हे मात्र पाहावे लागणार आहे.
यावेळी मा.नगराध्यक्ष नितीन कासार, शरीफ मुन्नाभाई शेख, अमृत पुदाले, संजय बेडगे, ताजुद्दीन सय्यद, अमोल सुरवसे, दत्ता राठोड, नवल कुमार जाधव सहकार्यकर्ते उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते, अशोक भाऊ जगदाळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश-राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता..!

0Share
Leave a reply












