राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : घर बांधण्यासाठी माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत, या मागणीसाठी एका २३ वर्षीय विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिया गणेश शिंदे (वय २३, रा. पठारवाडी, वनकुटे, ता. पारनेर, सध्या रा. गोंटुबे आखाडा, ता. राहुरी) हिचे लग्न दि. १७ एप्रिल २०२० रोजी गणेश भाऊसाहेब शिंदे (रा. पठारवाडी, वनकुटे, ता. पारनेर) याच्याशी झाले होते. सुरुवातीची दोन वर्षे सासरी संसार सुरळीत चालला; मात्र त्यानंतर सासरच्या लोकांनी “घर बांधायचे आहे, म्हणून माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये” अशी मागणी सुरू केली.
फिर्यादी सिया शिंदे हिने या मागणीस नकार दिल्यावर तिचा सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. अखेर सासरच्या त्रासाला कंटाळून सिया शिंदे हिने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून आरोपी गणेश भाऊसाहेब शिंदे व लताबाई भाऊसाहेब शिंदे (दोघे रा. पठारवाडी, वनकुटे, ता. पारनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ११७९/२०२५, भारतीय दंड संहिता कलम ११५(२), ३(५), ३५१(२), ३५२, ८५ अन्वये दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलिसांकडून सुरू आहे.
घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार आण म्हणत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, राहुरी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

0Share
Leave a reply












