प्रतिनिधी( ज्ञानेश्वर सुरशे) : आगामी होऊ घातलेल्या राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या व विकासाच्या मुद्यावर समविचारी पक्षा सोबत निवडणुकीत रहाणार असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली.,पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करत नगरपालिका व जिल्हा परिषद पंचायत समिती या संस्थेच्या निवडणुका न घेता अनेक वर्ष प्रशासक ठेवून स्वहीताची कामे करुन निवडणुका पाच वर्ष लेट करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करुन विकास कामांना खंड पाडला.
अनेक वर्षांपासून शेतकरी वर्ग अतिशय अडचणीतून वाटचाल करत असताना त्यातच चालू वर्षी अतिवृष्टी मुळे सोयाबीन कापूस कांदा व इतर पिकं नाश पावल्याने शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले व सरकारने त्यांना तुटपुंजी मदत देऊन त्यांची एक प्रकारे थट्टाच केली, कर्ज बाजारी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी म्हणुन त्यांना न्याय देण्यासाठी प्रहार चे नेते बच्चुभाऊ यांनी सरकारच्या विरोधात विविध आंदोलन करून शेतकऱ्यांना दिव्यांगांना सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राहुरी शहरांमध्ये प्रहारला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून नगरपालिका निवडणुकीमध्ये नागरिकांच्या विविध विकासासाठी शुद्ध नियमित पिण्याचे पाणी, सुसज्ज आरोग्य सेवा, गरिबांसाठी मोफत उच्च शिक्षण,सांडपाणी गटारी व सुसज्ज रस्ते तसेच शहरामध्ये खरेदीसाठी येणारे खेड्यातील नागरिक बंधू भगिनींनी यांच्या सोईसाठी शहरात ठिकठिकाणी शौचालय व्यवस्था व्हावी या व इतर विकासाच्या मुद्यावर आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रहार जनशक्ती पक्ष समविचारी पक्षा सोबत राहुन ताकदीने निवडणूक लढविणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी दिली,
नगरपालिका निवडणुकीत प्रहार विकासाच्या मुद्यावर समविचारी पक्षा सोबत रहाणार-सुरेशराव लांबे पाटील

0Share
Leave a reply












