राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ ) : राहुरीच्या भरपेठेत श्रीरामपूरातील एका माथेफिरु तरुणाने नशेमध्ये स्वतःच्या गळ्यावर चाकू मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण वेळीच राहुरीच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत काही तरुणांच्या मदतीने तत्काळ त्या माथेफिरूला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे बाजारपेठेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
श्रीरामपूर गोंधवणी रोड परिसरात राहणारा अर्जुन किसन जाधव या तरुणाने कुठलीतरी नशा करत राहुरीच्या बाजारपेठेत स्वतःच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रक्तबंबाळ झालेला अर्जुन जाधव शहरातील हा तरुण गस्तीवर असणारे राहुरीतील पोलीस कॉन्स्टेबल जयदीप बडे व वाहन चालक रोकडे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. या तरुणाला पकडून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला.
मात्र सदर तरुण कुठलीतरी नशा केल्याने तो वेडसरपणाचे सोंग घेत कोणालाही दाद देत नव्हता. अखेर पोलिसांनी आजूबाजूच्या तरुणांना मदतीला बोलवून या तरुणाला ताब्यात घेऊन राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना बोलवून घेत या तरुणाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
राहुरी बाजारपेठेत नशेत तरुणाचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न ; राहुरी पोलिसांच्या कार्यतत्परतेने वाचले तरुणाचे प्राण

0Share
Leave a reply












