SR 24 NEWS

राजकीय

राहुरीत खुर्द येथे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांना अभिवादन; सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Spread the love

प्रतिनिधी (ज्ञानेश्वर सुरशे ) :  जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, “काम सांगा… एका फोनवर फत्ते!” अशी ओळख निर्माण करणारे लोकनेते स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांना राहुरी येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावून त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत, डोळ्यांत पाणी आणि मनात कृतज्ञता घेऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणांतून सांगितले की, दिवंगत आमदार कर्डीले हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांनी कधीही पक्षभेद न पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. जनतेच्या प्रत्येक अडचणीवर तत्काळ तोडगा काढणारे, वर्षभर जनता दरबार भरवून नागरिकांना न्याय देणारे आणि समाजकार्य हेच धर्म मानणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नसल्याने राहुरी तालुका शोकाकुल झाला आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

शोकसभेची प्रस्तावना कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार डोळस यांनी केली. स्व. आमदार कर्डीले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्याचा मान ज्येष्ठ नेते गेणुभाऊ तोडमल यांना मिळाला. श्रद्धांजलीपर भाषणे अयुब पठाण, पुंजाजी आघाव, अश्वीनी कुमावत आणि प्रदीप पवार यांनी केली. या प्रसंगी नरेंद्र शेटे, अमोल डोळस, दिलीपराव आघाव, अशोक तोडमल, निसार शेख, बाबासाहेब पोपळघट, बाबासाहेब शेडगे, भाऊराव शेडगे, रफीक शेख, राजेंद्र खोजे, नानाभाऊ तोडमल, सचिन शेटे, राजू क्षिरसागर, एकनाथ माळी, जितेंद्र गिरासे, राजू वाघमारे, सतिष पावटे, राजू भांड, गोरख चोपडे, अक्षय पाटोळे, पवन गिरासे, गणेश चोपडे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दिवंगत आमदार कर्डीले यांच्या लोकसेवेचा सुवास अजूनही जनमानसात दरवळत असून, त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!