SR 24 NEWS

इतर

15 वर्षांनंतर ‘दहावी ब’चे विद्यार्थी पुन्हा एकत्र; भिगवणच्या भैरवनाथ विद्यालयात स्नेहमेळावा

Spread the love

इंदापूर तालुका प्रतिनिधी ( प्रविण वाघमोडे) : भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयातील सन 2009/10- च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी 15 वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल 40 विद्यार्थी या स्नेहमेळाव्यासाठी उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेचे काकडे सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

पाहुण्याच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेत आगमन होताच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आज आपापल्या क्षेत्रात यशस्वीरीत्या कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी यावेळी 15 वर्षांपूर्वीच्या अनेक आठवणी व प्रसंग सांगितले. यातील काही आठवणी या भावनेतून काही विनोदी. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत माजी विद्यार्थ्यांनी शाळेला खुर्च्या व शालेय उपयोगी वस्तू व गरजू विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणासाठी लागणारा खर्च उचलण्याची जबाबदारी यावेळी घेतली.या कार्यक्रमाला काकडे सर दराडे सर माने मॅडम देवकाते सर भागवत सर पळसे सर कर्पे सर व प्राचार्य खराडे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहेल शेख यांनी केले, तर प्रास्ताविक विकास खरात यांनी केले आणि आभार अक्षय ताटे यांनी मानले.

यावेळी राहुल ढवळे, स्वप्नील कदम, राहुल गाडे, सोहेल शेख, सचिन पवार,निलेश गायकवाड, अक्षय ताटे, हेमंत घुसाळकर, माऊली गिरंजे, वैभव गुणवरे, किरण सावंत, वैभव कारंडे, सुमित ठवरे,अक्षय सोनटक्के, शुभम अग्रवाल, वसीम शेख,, शाहरुख शेख, दीपक शिंदे,ओंकार मस्कर,चारुदत्त साळुंखे, संभाजी देवकाते,किरण धंगेकर तसेच मुलींमध्ये आम्रपाली बंडगर,दिपाली बंडगर, प्रियंका बंडगर,पायल शेख,सोनाली कचरे, स्वाती खरात,सोनाली भोई,भाग्यश्री कदम, पूजा काळे,दिपाली जगताप,पल्लवी जगताप, मेघा बंडगर,शितल गारदे,रोहिणी वायसे,कांचन शिंदे,स्नेहल वाघमोडे आदिजन उपस्थित होते.आदिजन एकत्र मिळून कार्यक्रम यशस्वी केला .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!