राहुरी ग्रामीण प्रतिनिधी ( ज्ञानेश्वर सुरशे) : राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा गावातील ग्रामस्थांनी राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, जनतेच्या मनात घर करणारे नेते, जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी मंत्री स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डीले यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जनतेच्या हितासाठी आयुष्यभर झटणाऱ्या कर्डीले साहेबांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण मतदारसंघात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, ग्रामस्थांनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत श्रद्धांजली सभेचे आयोजन केले. ही सभा तमनर आखाडा सोसायटीसमोर दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडली. ग्रामस्थांनी दिवंगत आमदारांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या कार्याचा व जनसेवेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
प्रा. संजय तमनर यांनी आपल्या भाषणात कर्डीले साहेबांच्या विकासाभिमुख कार्याचा, जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा व आयुष्यभर त्यांनी जोपासलेल्या जनसेवेच्या मूल्यांचा उत्कटतेने उल्लेख केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे मतदारसंघात झालेल्या विविध विकासकामांचा गौरवही सभेत करण्यात आला. तसेच स्वर्गीय आदरणीय आमदार श्री शिवाजीराव कर्डिले साहेब एक सर्व समावेशक आमदार व लोकप्रतिनिधी होते पक्ष विरहित राजकारण त्यांनी केलं सर्वसामान्यांची नाळ जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय आमदार साहेब होते. विशेष म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कुणाही मध्यस्थांची त्यांना गरज नव्हती ते व्यक्ती स्वतः आमदार साहेबांशी चर्चा करून प्रश्न सोडवत असत. नियतीने साहेब आपल्याकडून हिरावून घेतले पण अक्षयदादा हे आमदार होणे हीच साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा भावना यावेळी प्रा. संजय तमनर यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी भाऊसाहेब तमनर, लहानु बाचकर, शिवाजी वाचकर सर, सौरभ तमनर, गोपीनाथ कोपनर, भारत बोर्डे साहेब, अंकुश तमनर, निखिल तमनर, श्रीराम तमनर, संपत बाचकर, अमोल कोपनर, सुनील बाचकर, राहुल तमनर, विनोद कोपनर, शांताराम तमनर, सागर तमनर, राहुल वाचकर, आदिनाथ (बबलू) तमनर, शरद तमनर, भैय्या पांढरे, प्रा. नाना तमनर, राम तमनर, किशोर तमनर, रोहित तमनर, संदीप तमनर, कोंडीराम तमनर, वेदांत तमनर, घोलप तमनर, बाळू पिसे सर, भाऊसाहेब खेमनर, शंकर पिसे, सुनील पिसे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय तमनर यांनी केले, तर सभेचा समारोप दोन मिनिटांच्या मौनाने कर्डीले साहेबांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आला.
Leave a reply













