राहुरी वेब प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी (बुधवार) सकाळी मानोरी येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती.सभेमध्ये विविध मान्यवरांनी आमदार कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. उपस्थित सर्वांनी त्यांच्या कार्याची, लोकाभिमुख स्वभावाची आणि जनतेशी असलेल्या आत्मीय नात्याची आठवण काढली.
आ. कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे राहुरी तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले असून, “ही कधीही भरून न निघणारी पोकळी आहे,” अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या. तळागाळातील कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून राज्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेल्या या नेत्याने सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. विरोधकांचा विचार न करता सर्वांचे प्रश्न ऐकून त्यांच्या कामांचा निपटारा करणारा, आणि ३६५ दिवस जनता दरबार घेणारा जिल्ह्यातील पहिला नेता म्हणून त्यांची ओळख होती.
या वेळी संभुगिरी महाराज गोसावी, किशोर महाराज जाधव, उत्तमराव खुळे, निवृत्ती आढाव, साहेबराव तोडमल, रविंद्र आढाव, बापूसाहेब वाघ, उत्तमराव आढाव, डॉ. बाबासाहेब आढाव, गोकुळदास आढाव, भाऊसाहेब आढाव,पै संजय पवार, बाळासाहेब कोहकडे, पोपटराव आढाव यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याचा गौरव केला आणि आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाला लक्ष्मण महाराज चौगुले, कचरू नाना आढाव, भिमराज वाघ, डॉ. राजेंद्र पोटे, पोपटराव पोटे, अण्णासाहेब तोडमल, शामराव आढाव, आणासाहेब ठुबे, शिवाजी थोरात, भास्कर भिंगारे, नानासाहेब आढाव, कचरूभाऊ आढाव, संजय डोंगरे, बाळासाहेब पोटे, विठ्ठल वाघ, बाळासाहेब आढाव, सोपान आढाव, प्रकाश चोथे, कारभारी थोरात, कैलास आढाव, दिलीप थोरात, भारत आढाव, फक्कडभाई शेख, डॉ. सागर शेलार, भिमराज वाकचौरे, सागर भिंगारे, चंद्रभान वाघ, गोरक्षनाथ गुंड, राजेंद्र पिले, सागर नेहे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन एक मिनिट मौन पाळले व ‘पसायदान’ म्हणत दिवंगत आत्म्यास शांती लाभावी अशी प्रार्थना करण्यात आली.
दरवर्षी भाऊबीज निमित्ताने मानोरी येथे पारंपरिक घोडा-बैल शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र, आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे यंदा गावातील वातावरण शोकमग्न असल्याने या वर्षीची शर्यत रद्द करण्यात आली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
Leave a reply













