विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला तर टाकळी ढोकेश्वर गण नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षणानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणातून खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी आपल्या पत्नी सरपंच अरुणा खिलारी यांना पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.
आरक्षण जाहीर होताच खिलारी समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झाले असून आता फिक्स पंचायत समिती सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाच्या सरपंच अरुणा खिलारी या आगामी पंचायत समिती निवडणुकीत रिंगणात उतरल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, अरुणा खिलारी यांचे नाव या निवडणुकीच्या चर्चेत आघाडीवर आहे.
सरपंच अरुणा खिलारी ३० वर्षांपासून टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाची भक्कम पायाभरणी केली. निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून करोना महामारीच्या काळात बाळासाहेब खिलारी यांनी खासदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांच्या नेतृत्वशैलीमुळे स्थानिक पातळीवर मजबूत जनसंपर्कचे जाळे निर्माण झाले आहे.
बाळासाहेब खिलारी यांचा सर्वच घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांशी लोकसंपर्क, राजकीय कसब आणि समाजातील सर्व स्तरात असलेली चांगली प्रतिमा पाहात अरुणा खिलारी यांना टाकळी ढोकेश्वर गणातील भोंद्रे, काकणेवाडी, तिखोल, ढोकी, टाकळी ढोकेश्वर, वासुंदे, वडगाव सावताळ, गाजदीपूर खडकवाडी, मांडवे खुर्द, देसवडे, या गावातील आजी – माजी सरपंच सदस्य चेअरमन संचालक यांचा खंबीर पाठिंबा दिला असून सरपंच अरुणा खिलारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
निष्ठा व सक्रीय योगदान
सरपंच अरुणा खिलारी यांचे पती बाळासाहेब खिलारी हे गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या माध्यमातून व खासदार निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. पक्षात फूट पडल्याच्या काळातही त्यांनी पक्षाशी निष्ठा राखत काम सुरू ठेवले. महाविकास आघाडीच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके, तर विधानसभेला माजी सदस्या राणीताई लंके या महाविकासआघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काम केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत तसेच महाविकास आघाडीतील इतर नेत्यांमध्येही त्यांचा विश्वासार्ह नेत्या म्हणून लौकिक निर्माण झाला आहे.
टाकळी ढोकेश्वर गणात संपर्क मोहिमेला गती
सध्या अरुणा खिलारी या टाकळी ढोकेश्वर गणातील जनसंपर्क मोहिमेला गती देत आहेत. स्थानिक महिला, युवक, आणि विविध सामाजिक घटकांशी गाठीभेटी, संवाद व कार्यकर्त्यांशी बैठकांचे सत्र सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांना व समाजकार्यातील सक्रिय सहभागाला स्थानिक नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
महाविकास आघाडीची जागावाटप आणि चर्चा
आरक्षण जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील नेत्यांशी समन्वय साधून जागावाटपाची चर्चा झाली आहे. वरिष्ठांनी या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाने टाकळी ढोकेश्वर गणाची जागा लढण्याची तयारी दर्शवली असून, महाविकास आघाडीमधील नेत्यांनाही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे असे अरुणा खिलारी यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सभापतीपद महिलेला असल्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिकच बळावली आहे.
टाकळीढोकेश्वर पंचायत समिती गणातून अरुणा खिलारी निवडणुकीच्या रिंगणात, अरुणा खिलारी या सक्षम महिला नेतृत्वाला मिळतोय भक्कम पाठिंबा

0Share
Leave a reply












