राहुरी प्रतिनिधी (सोमनाथ वाघ) : छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, मानोरी येथील प्राचार्य मा. उत्तमराव खुळे सर यांची सेवानिवृत्ती नुकतीच संपन्न झाली. त्यांच्या दीर्घ शैक्षणिक सेवेला गौरवून तसेच मानोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. वैशालीताई उत्तमराव खुळे यांची नुकतीच झालेली निवड या दोन्ही कारणांनी विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्यात जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रमुख उपस्थित राहून प्राचार्य खुळे सरांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी आमदार कर्डिले म्हणाले की, “प्राचार्य खुळे सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनुकरणीय असून त्यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.” तसेच उपसरपंचपदी निवड झालेल्या सौ. वैशालीताई खुळे यांचे अभिनंदन करताना त्यांनी, “ग्रामविकासाच्या कामात त्या नवे योगदान देतील, अशी अपेक्षा आहे,” असेही नमूद केले.
या प्रसंगी निवृत्ती आढाव, उत्तमराव आढाव, बापूसाहेब वाघ, पत्रकार विनीत ढसाळ, शामराव आढाव, पोपटराव आढाव सर, दादासाहेब चोथे, जबाजी बाचकर, किरण आढाव यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते प्राचार्य उत्तमराव खुळे सरांचा सत्कार व उपसरपंच सौ.वैशालीताई खुळे यांचे अभिनंदन

0Share
Leave a reply












