इंदापूर तालुका प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : भारतीय संस्कृतीत दसऱ्या निमित्त शस्त्र व मशिनरी पूजन केले जाते त्याच प्रमाणे आज विठ्ठलराव थोरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिगवण येथे शस्त्र व मशिनरी पूजन करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बापुराव थोरात सचिव विजयभैय्या थोरात, हिराबाई (आत्या) बंडगर, स्वप्निल थोरात, अनिकेत थोरात उपस्थित होते.
यावेळी सर्व व्यवसायात (ट्रेड) ची विद्यार्थी व शिक्षक यांनी आकर्षक अशी सजावट केली होती यावेळी प्रत्येक ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक प्रोजेक्ट तयार केले व यांचे सादरीकर केले होते प्रत्येक ट्रेडमध्ये जाऊन अध्यक्ष बापुराव थोरात, सचिव विजयभैय्या थोरात, हिराबाई आत्या बंडगर, स्वप्निल थोरात, अनिकेत थोरात, प्राचार्य मोहिते सर, गट शिक्षक विकास लिमकर सर, मेकॅनिक डिझेलचे शिक्षक योगेश पालखे सर, फिटरचे शिक्षक सागर गुणावर सर व शुभम वेदपाठक सर, वेल्डरचे शिक्षक सोमनाथ बनसोडे सर, इलेक्ट्रिसियचे शिक्षक संजय झगडे सर व विकास मीना सर, लिपिक प्रविण वाघमोडे सर तसेच शिपाई विमल चंदनशिवे मावशी व विद्यार्थी यांनी सर्व शस्त्र व मशिनरी यांचे पूजन केले.
यावेळी संचालक मंडळ यांनी आकर्षक सजावटी व प्रोजेक्टसाठी सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले.
Leave a reply













